Ad will apear here
Next
मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका


नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.

नाशिक-पुणे रस्त्यावर असणाऱ्या बोधलेनगर येथे सुपर बाईक वॉश समोरील वीजेच्या तारांवर पतंगाचा मांजा होता. त्यात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी कबूतर अडकले. कबुतराने त्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपड केल्यामुळे मांजाचा फास त्याच्या पायाभोवती व पंखाभोवती गुरफटला. अखेर कबूतर वरून खाली पडल्यानंतर सलून व्यावसायिक गणेश मिसाळकर यांनी त्याला उचलले. नागरिकांनीही या ठिकाणी धाव घेतली. नागरिकांनी ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक नितीन पंडित यांना दिली. पंडित, आकाश भालेराव, रत्नाकर मोहिते, रूपाली सूर्यवंशी, संतोष  सरोदे आदींनी कात्रीच्या सहाय्याने मांजा कापून कबुतराला मोकळे केले. सुटण्याच्या धडपडीत कबुतराला जखमाही झाल्या. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. नागरिकांनी त्याच्यावर औषध उपचार करून पाणी पाजले. थोड्यावेळाने तरतरी आल्यावर कबुतराने आकाशात झेप घेतली.

नायलॉन मांजा न वापरण्यासाठी प्रशासन व सामाजिक संघटना जनजागृती करीत आहेत; मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. बंदी असतानाही नाशिक रोडसह शहरात नायलॉन मांजाची बेकायदा विक्री झाली. पतंगप्रेमींची एक दिवसाची हौस झाली; मात्र त्याचे परिणाम पशु-पक्षांना अजूनही भोगावे लागत असल्याचे या घटनेवरून दिसून आले. महापालिकेने झाडे, तारा व अन्य ठिकाणांवरील मांजा नष्ट करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZOVBX
Similar Posts
मनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने १९ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत
नाशिक रोड येथे पाणी बचतीसाठी पत्रकांचे वाटप नाशिक : सध्या महाराष्ट्र भीषण पाणी टंचाईला सामोरा जात असल्याने पाणी बचतीविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) नाशिक रोड परिसरात पाणी बचतीसंदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
पुणे-नाशिक प्रवास आता केवळ दीड तासांचा नाशिक : रेल्वे खात्याने प्रवाशांना गुणवत्तापूर्ण प्रवास करायला मिळावा यासाठी निरनिराळ्या योजना आखल्या असून, पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्ग हा त्याचाच एक भाग आहे. या लोहमार्गाचे काम फेब्रुवारी २०१९पासून सुरू होणार आहे. २३१ किलोमीटरच्या हायस्पीड लोहमार्गाचे काम झाल्यानंतर पुण्याहून नाशिकला येण्यासाठी केवळ दीड तासाचा अवधी लागणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language